Breaking News
घनसावंगी तालुका

शनिवारी कुंभार पिंपळगावात परत दोन जणांचा अँटीजण अहवाल पॉझिटिव्ह

कुंभार पिंपळगाव दि ८ – घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील दोन जणांचा कोरोना  अहवाल शनिवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यात ११ वर्षीय मुलगी तर ,४८ वर्षीय पुरुष, यांचा समावेश असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. घनसावंगी आरोग्य विभागाकडून रपीड अँटीजण चाचणी कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी दुपारी एक च्या सुमारास करण्यात आली यात गावातील 22 जणांचे स्वाँब घेण्यात आले होते त्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून उर्वरित 20 जणांचे अहवाल मात्र निघेटिव्ह आले आहेत. आता कुंभार पिंपळगावात एकाच आठवड्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यामुळे आता कुंभार पिंपळगावकरांनी सोशल डिस्टन्स, मास्क, व स्निटायजर चा वापर करणे मात्र गरजेचे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक