Breaking News
भोकरदन तालुका

चांदई ठोंबरे येथे पोखरा योजने अंतर्गत शेतमजुरांना कौशल्य प्रशिक्षण


दत्ता डवले/श्री क्षेत्र राजूर
भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी येथे शनिवारी प्रगतशील शेतकरी रामराव धोंडीबा ठोंबरे यांच्या शेतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल शेतीशाळा प्रशिक्षक संजय चव्हाण,रिसोर्स पर्सन ज्ञानेश्वर टोम्पे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी समूह साहाय्यक सुयश सावंत ,सरपंच विठ्ठल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य कडुबा देठे, शेख ताहेर शेख,उत्तम रावळकर,दादाराव ठोंबरे , तंटामुक्ती अध्यक्ष दादाराव ठोंबरे , पोलीस पाटील सांडू ठोंबरे,शिवाजी ठोंबरे,हनुमंता ठोंबरे,रंगनाथ सरडे, इतर शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना फवारणी करता सेफ्टीकिट वापरा याबद्दल माहिती रिसोर्स पर्सन ज्ञानेश्वर टॉम्पे यांनी शेतकरी वर्गाला पिकामध्ये कामगंध सापळी चिकट सापळे फेरोमेन ट्रॅप पक्षी थांबे लावण्या बद्दल मार्गदर्शन केले. शेतीशाळा प्रशिक्षक यांनी शेतकऱ्यांना घरच्या घरी कमी खर्चात शेती सेफ्टी किट कशी बनवायची याबद्दल माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक