Breaking News
बदनापूर तालुका

छावा क्रांतीवीर सेनेकडून कर्नाटक मधील त्या घटनेचा निषेध

बदनापूर : ता. 09: बदनापूर प्रतिनिधी किशोर सिरसाठ

कन्नड रक्षक गुंडाकडून महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज ज-हाड यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक बदनापुर येथे कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो” “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.

परंतु आजही कर्नाटक प्रशासन महाराष्ट्रच काय अखंड हिंदुस्थानचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करत असले तर त्यांनी याद राखाव महाराष्ट्रात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही. यांची नोंद कर्नाटक सरकारने घ्यावी. केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. भाजपच जिथे सरकार आहे तिथे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे कृत्य होत आहेत. ही गोष्ट वेळीच भाजप सरकारने रोखावी अन्यथा महाराष्ट्रातील छावा सैनिक शांत बसणार नाही, त्यांची छावा क्रांतीवीर सेनेशी गाठ असेल, याची दखल घ्यावी. घडलेली घटना छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करन गायकर व वरिष्ठ नेत्यांना कळविली असून, संघटना प्रमुखांचा आदेश आल्यास कर्नाटकात घुसून कर्नाटक सरकारचा माज उतरवू, असा इशारा दिला.

यावेळी बोलताना पंकज ज-हाड यांनी, पिसालेल्या जनावराप्रमाणे माज या कर्नाटकी सरकार ला आला असून मराठी माणसांवर होणाऱ्या प्रत्तेक घावाचा बदला घेतला जाईल. सीमा भागातील मराठी माणसावर दडपशाही करण्याचे प्रकार होत असेल तर खबरदार मराठी माणसांच्या वाटेला जाल तर जशास तसे उत्तर देऊ. आमच्या आराध्य दैवतांना हात लावायची हिम्मत करू नये, अन्यथा मराठा अस्मितेचा भगवा झेंडा अटकेपार फडकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी.संघटनेचे शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज ज-हाड, वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष अर्जुन पठाडे,योगेश कडोस,गणेश कोल्हे,विलास कोल्हे,शिवा दाभाडे,अमोल ज-हाड, इमरान शेख,दिपक कैकान इत्यादि उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक