जालना जिल्हा

अंबड-घनसावंगी-आष्टी राज्य महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामाला स्थगिती

न्यूज जालना ब्युरो /तुकाराम राठोड (सावंगीतलाव)

जिल्ह्यातील अंबड-घनसावंगी-आष्टी या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम शासनाद्वारे मंजुर करण्यात येऊन गुजरात येथील कलाथिया इंजिनियरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपणीच्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. परंतु या रस्त्यालगतच्या कोणत्याही शेतकऱ्यांला कायदेशीर नोटीस न देता तसेच रुंदीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे कोनतेही कायदेशीर अधिग्रहण न करता व त्याचा मोबदला न देताच काम सुरू करण्यात आलेले आहे.


वास्तविक पहाता महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ मधील तरतुदीनुसार शासनाने आधी जमिन अधिग्रहण करुन मगच काम कले पाहिजे. परंतु तसे करण्यात आलेले नाही.


याबाबत अधिक माहीती घेतली असता संबधित शेतकऱ्यांना त्याबाबत कंपणीचे कर्मचारी, महसुल व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या मार्फत सांगण्यात आले कि, सदरिल रस्ता आधीचाच असुन त्याचा मोबदलाही यापुर्वीच देण्यात आलेला आहे. परंतु, सदरील राज्य महामार्गाच्या प्रस्तावित रुंदीकरणासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नाही व रुंदीकरणाच्या कामात रोडमध्ये बाधीत होणा-या जमिनीचा मोबदलाही संबधित शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेला नाही व तसे केल्याबाबत कोणतेही अभिलेख शासनाच्या संबधित विभागाकडे उपलब्ध नाहीत.


सदरील रोडलगत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देता शासनाद्वारे खाजगी कंपणीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीवर करण्यात येणाऱ्या बेकयदेशिर कामाबाबत व्यथित होऊन मौजे मोहपुरी, बोधलापुरी, ढालसखेडा, वलखेडा,पांगरखेडा, अंबड येथील नागरीकांनी अॅड. दीपक राजपूत यांच्या मार्फत मा. ना. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचेसमोर रिट याचिका दाखल करुन अधिग्रहीत होणा-या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी दाद मागीतली आहे. सदरील याचिकेच्या सुनावनी दरम्यान हि बाब मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आली. त्यामुळे मा. उच्च न्यायालय यांनी शासनाचे बांधकाम विभाग व बांधकाम कंपणीद्वारे चालु असलेल्या कामास पुढील सुनावनीपर्यंत स्थगिती दिली असुन शासनास उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.


सदरिल याचिकेमध्ये शेतकरी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. दीपक राजपूत काम पहात असुन त्यांना अॅड. अर्जुन लुखे व अॅड. रवि राठोड हे सहकार्य करत आहेत. शासनाच्या वतीने अॅड. यावलकर हे काम पहात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक