Breaking News
घनसावंगी तालुकाशेतीविषयक

फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक अडचणीत .!पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी.

धर्मराज आंधळे/पिंपरखेड
घनसावंगी तालुक्यातील पिपंरखेड बु परिसरात मोसंबी फळ गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.


पिपंरखेड बु परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड केली आहे.
गतवर्षीपासून परिसरात जोरदार पाऊस होत आहे. यावर्षीही जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यातच मोसंबीचा आयबहार चांगला बहरला होता. फळे चांगली लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबी बागेत अशी फळ गळती होत आहे.
मोसंबीच्या सुरु असलेल्या फळगळतीमुळे शेतकयांचे मोठे नुकसान होत आहे.याचा फटका उत्पन्नावर होणार आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावे अशी शेतकर्याची मागणी आहे

यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे म्हणून ४०० चे झाडे लावली परंतु मोसंबीची फळगळती होत आहे. , सध्या तोडणी योग्य फळांची गळती होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत  अभिजीत गाेरकर शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक