Breaking News
अंबड तालुका

अंबडमध्ये लोकसहभागातून केला जाणारा मोकळ्या जागेचा कायापलट.

अनिल भालेकर/अंबड

चांगले विचाराने,उद्देशाने एकत्र येऊन लोकसहभागातून, प्रशासनाच्या कामाची व मदतीची वाट न पाहता, मोकळ्या भूखंडाचा कायापालट करण्याचा संकल्प करून आदर्श निर्माण करण्याचे कार्य अंबड शहरातील सोना नाना पार्क या वसाहतींमधील नागरिकांनी केले आहे.


या वसाहतीमध्ये असणार्‍या मोकळ्या जागेत (34/2) तार कंपाउंड करून वृक्षारोपण केले जाणार आहे. यासाठी लोकसहभागातून 40 हजार रुपये जमा केले आहेत. या कामाचा शुभारंभ डॉ.भुजंगराव डावकर यांच्या हस्ते आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी करण्यात आला. वसाहतीमधील प्रत्येक रहिवाशाने यासाठी आपापल्या परीने योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ.डावखर यांनी वसाहतीतील नागरिकांचे आभार मानले.

जमा झालेल्या वर्गणीतून तार कंपाउंड, विविध प्रकारची उपयुक्त झाडे, मन प्रसन्न करणारी फुलांची झाडे, या झाडांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून ठिबक, आत बसण्यासाठी बेंचेस ची व्यवस्था केली जाणार आहे.याचा नक्कीच फायदा वसाहतीतील बालके,महिला,आबाल वृद्ध यांना तर होईलच परंतु हा परिसर मन प्रसन्न करणारा ठरणार आहे.
या आदर्श कार्याच्या शुभारंभप्रसंगी अमोल वराडे, शिंदे,खारवडे, कबले, रणमळे, चव्हाण,बेवले आदी वसाहतीतील रहिवाशी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक