जालना तालुका

दुधना काळेगाव येथे शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रविवारी मौजे दुधना काळेगाव तालुका जिल्हा जालना. येथे सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी, चिकट सापळ्यांचा वापर पक्षी थांबे उभे करणे इत्यादी विषयावर शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी मार्गदर्शन केले तसेच शेतीशाळा प्रशिक्षक सुनील पाटोळे यांनी शेतीशाळेचे प्रस्ताविक करत पाच टक्के निंबोळी अर्क विषयी माहिती सांगितली

व समूह सहाय्यक संदीप मगर यांनी शेती शाळेत उपस्थित शेतकरी तसेच कर्मचारी त्यांचे आभार व्यक्त करत शेतीशाळेचे समारोप केला या शेतीशाळेत प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच अनिरस मस्के, उपसरपंच रणजीत भांदरगे,ज्ञानेश्वर भांदरगे,विठ्ठल विठ्ठल,कृषी मित्र वसंत भांदरगे, शिवप्रसाद भांदरगे व तसेच गावातील शेतकरी व शेतमजूर यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक