बदनापूर तालुका

बाजार गेवराई ते फाटा रस्त्यांवरील खड्यात बेशरम लावून अनोखे आंदोलन


बाजार गेवराई/ प्रतिनिधी

बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई ते फाटा ह्या तीन किमी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रविवारी ग्रामस्थांनी त्या खड्यात बेशरम लावून प्रशासना चा निषेध व्यक्त केला

गेवराई बाजार या गावात जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार व जनवराचा बाजार भरतो कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद असल्याने गावातील फाटा ते गाव ह्या ३ कि .मी रस्त्यावर ठिकठिकाणी नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचुन मोठ मोठे भदंगाडे पडल्याने वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते अनेकदा दुचाकी चालकांना कंबर दुखी व मंणक्याचे दुखणे आदी विविध आजारांचे प्रमाणही वाढत आहे

त्यामुळे व छोटे मोठे किरकोळ अपघात सुद्धा या रस्त्यावर होत असुन व सदर रस्ता डागडुजी करण्यासंदर्भात संदर्भात प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी रस्त्यावर बेशरमांची झाडें व फुले लावुन अनोखे आंदोलन करून तिव़ शब्दात प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या संदर्भातील विभागाने या रस्त्यांची डागडुजी करण्याची दादाराव कान्हेरे , रमेश मोरे कैलास कान्हेरे , सुखदेव कान्हेरे , गणेश जोशी , ज्ञानेश्वर जोशी आदी ग्रामस्थांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक