Breaking News
भोकरदन तालुका

केळना नदी पाञात तरुणाचा बुडुन मृत्यु-नदी पात्रातून बैल घेऊन जात असताना घडली घटना

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शेतकऱ्याचा मुलगा सतीश साहेबराव ठाले (वय २१) नदीपात्रातून बैल घेऊन जात असताना पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता ९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.


याबाबत अधिक माहीती अशी की,आव्हाना येथील केळणा नदीपात्रात आज दि.९ आॅगस्ट रविवार रोजी सकाळी ९ वाजता सतिष ठाले हा तरुन नदीपात्रातून बैल शेतीकामासाठी घेऊन जात होता अचानक बैलाचा कासरा अडकल्यामुळे सतीश पाण्यात पडला व बैलाने जोरात वढल्यामुळे तो पाण्यात बुडाला

रस्त्यालगत शेतीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी त्याला पाण्यामध्ये बुडताना पाहून आरडाओरड केली परंतु नदी पात्राला पाणी वाहत असल्यामुळे . तरुणाने त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पुढील उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी सतीशला मृत म्हणून घोषित केले शवविच्छेदनानंतर सतीश चा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन आव्हाना येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक