बदनापूर तालुका

किसान संघर्ष समितीच्या वतीने किसान मुक्ती दिवस साजरा


बाजार गेवराई / योगेश लहाने

बदनापुर तालुक्यातील बाजार गेवराई येथे किसान मुक्ती दिन हा राष्ट्रीय संघर्ष दिवस म्हणून साजरा करण्यात आला केंद्र सरकारने शेती विषयक समर्थन मूल्य शासन परिपत्रके २०२० शेतकऱ्यांच्या विरोधी असुन सदर विज संशोधन शासन निर्णय मागे घ्यावा फेब्रुवारी ते जून ताळेबंदी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

सदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी मनरेगा अंतर्गत उपलब्ध रोजगार २०० दिवसा पर्यंत वाढवा आदी विविध मागण्यां साठी बाजार गेवराई येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी परिपत्रके जाळुन निषेध केला त्यावेळी राष्ट्रीय जनआंदोलन समन्वयक गणेश जोशी , दादाराव कान्हेरे , रमेश मोरे , कैलास कान्हेरे , सुखदेव कान्हेरे ,ज्ञानेश्वर जोशी आदी शेतकरी बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक