भोकरदन तालुका

गावात एका रुग्णाला कोरोणाची लागण,पिंपळगाव रेणुकाईत शुकशुकाट रस्ते निर्मनुष्य

पिंपळगाव रेणुकाई /प्रतिनिधी दि ९

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णाची तपासणी करतांना आतापर्यंत 25 रुग्णाचे लाळेचे नमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणात आले होते. त्यापैकी पिंपळगाव रेणुकाई येथील एक महिला रुग्णाला घश्याचा त्रास होत होता.या तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मागील चार महिन्यांपासुन गावात एकही रुग्ण नसल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण होते. मात्र पहिला रुग्ण आढळून आल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. त्या महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर लोकांचा शोध घेणे सुरु आहे. अति जोखमी लोकांचे आणखी लाळेचे नमुने जिल्हा प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ राऊत आर एम यांनी दिली.

गावामध्ये आरोग्य विभाग व ग्रामपंचायत मार्फत कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. गावामध्ये तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी व डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने धुर फवारणी करावी अश्या सुचना देखील आरोग्य विभागामार्फ़त ग्राम पंचायत प्रशासनास देण्यात आलेल्या आहेत सोशल डिस्टंनसिंग मास्कचा वापर करणे , व हाताची स्वच्छता यासंबंधी नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यापुढे अत्यावशक सेवा वगळता 3 दिवस कडकडीत बंद पाळण्यात येवुन जनता करफ्युचे पालन करण्यात येणार आहे.

या कामी आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ आर. एम. राऊत, आरोग्य सहायक शिंदे, इंगळे, पोटे, फडाट, राकडे श्रीमती रायलकर , दुलहत, खेसर , प्रेमलता गुप्ता , सीमा देशमुख, ढमाले केले आहे.हे सातत्याने गावांमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वे करत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच समाधान देशमुख , कर्मचारी विनोद आहेर, प्रभू आहेर, आकाश फरकाडे या सर्वांच्या नियोजनामुळे आरोग्य विभागास एक प्रकारचे खुप मोठे सहकार्य होतांना दिसुन येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक