Breaking News
मंठा तालुका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनादर शिवसेना कदापिही सहन करणार नाही-जिल्हाप्रमुख ए जे बोराडे

मंठा /रमेश देशपांडे दि ९ :

केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदराची भावना आहे मात्र कर्नाटकच्या निर्लज्ज सरकारने तमाम जनतेचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा अनादर केला ही घटना निंदनीय असून महापुरुषांचा अनादर शिवसेना कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिला. मंठा शिवसेना व युवा सेनेच्या वतीने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून आणि पुतळ्याचे दहन करून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

यावेळी माजी सभापती संतोष वरकड, शिवसेना तालुका प्रमुख अजय अवचार, नगराध्यक्ष नितीन राठोड, नगरसेवक बालासाहेब बोराडे, इल्यास कुरेशी, प्रदीप बोराडे, अरुण वाघमारे, नीरज सोमानी, युवा सेना तालुका प्रमुख डिगंबर बोराडे ,उपशहर प्रमुख गजानन बोराडे, महादेव खरात, गणेशराव वायाळ, नाना बोराडे, अजय नरोटे, भागवत चव्हाण, विष्णुपंत बोराडे ,गंगा गवळी, अनिल हिरे, राहुल गोंडगे, स्नेहल हिवाळे, राहुल खरात यांची उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गौरवोद्गार काढले यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत भाजप सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक