Breaking News
घनसावंगी तालुका

भारत बचाव आंदोलनास राजा टाकळी, उक्कडगाव,मुद्रेगाव, ग्रामपंचायत समोर लाल बावट्या चे वतीने धरणे आंदोलन

कु.पिंपळगाव /संभाजी कांबळे दि ९ :

मोदी सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी धोरण,वाढती बेरोजगारी,कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश, सार्वजनिक उद्योग व संसाधनांचे खाजगीकरण लावलेला सपाटा या देश विघातक नीती विरुद्ध आज ९ ऑगस्ट क्रमतीदिनी संपूर्ण देशभर किसान सभा,सिटू,शेतमजूर युनियन लाल बावटा च्या वतीने होत असलेल्या ‘भारत बचाव’ आंदोलनाचा भाग म्हणून राजा टाकळी, उक्कडगाव,मुद्रेगाव येथे ग्रामपंचायत समोर कॉम्रेड गोविंद आर्दड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात खालील मागण्या करण्यात आल्या

आयकर न भरणाऱ्या प्रत्येक नागरिकास प्रति महा पुढील सहा माहीण्यासाठी 7500 रु केंद्र सरकारने अनुदान द्यावे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा,शेतमालाला C2 सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक 50%नफा असा हमी भाव द्या,पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या परेशान करणाऱ्या मुजोर बँक अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करून तात्काळ पीक कर्ज वाटप करा,युरिया खताची टंचाई दूर करा.


,बांधकाम मजुरांना कोरोना पार्श्वभूमीवर वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून त्यांना आणखी 8 हजार रुपये देण्यात यावे. त्यांचे शिष्यवृत्ती विवाह,प्रसूती इत्यादी अनुदानाचे प्रस्ताव त्वरित निकाली काढा,त्याचा त्यांना त्वरित लाभ द्या,बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करा.
३)आशा-गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका,शालेय आहार कामगार,ग्राम रोजगार सेवक याना किमान वेतन 21 हजार रु करा त्यांना सेवेत कायम करा,कोरोना च्या कामासाठी त्यांना प्रतिदिन 300 रु भत्ता द्या,सुरक्षा साहित्य द्या.

,शेतमजुरांना गावात रो ह यो ची कामे उपलब्ध करून द्या,त्यावर 500 रु प्रतिदिन मजुरी द्या.
महिलांवरील वाढते अत्याचार वाढते अवैद्य धंदे पाहता पोलीस प्रशासनातील रिक्त पदे भरा,
,बेरोजगार तरुणांना रोजगार द्या,नसता रोजगार भत्ता द्या. ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची फी माफ करा.खाजगी कलासेस कडून शाळांकडून पालकांची लूट होत त्यावर निर्बंध घाला.
,राजा टाकळी प्रा आरोग्य केंद्रातिल रिक्त पदे भरा मोफत आरोग्य सुविधांमध्ये वाढ करा.अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा.
,रेशनिगचे प्रश्न सोडवण्यासाठी राजा टाकळी गावात कॅम्प आयोजित करा.धान्यापासून वंचित असलेल्या सर्वाना धान्य उपलब्ध करून द्या..
,ग्राम पंचायत कार्यालयाचा सन 2016 ते आजपर्यत झालेल्या जमा खर्चाचा हिशोब सर्व गावकऱ्यांना सादर करावा.
,गावातील शौचालय वापरण्यास सक्ती करावी ज्यांना शौचालय नाही त्यांना त्याचा निधी उपलब्ध करून द्यावा.गाव हागणदारी मुक्त करावे.गावामध्ये दररोज घंटागाडी फिरून कचरा साफ करावा गावात स्वछता ठेवावी स्वछता ठेवावी.
,ग्रामपंचायत च्या संगणकामार्फत नागरिकांचे सर्व ऑनलाइन कामकाज मोफत करण्यात यावे.
,दारिद्र्य रेषेचा सर्व्हे करण्यात यावा त्यात वंचित गरीब लोकांचा समावेश करावा.
या व इतर मागण्याचे निवेदन यावेळी तलाठी व ग्रामसेवक याना देण्यात आले.
या आंदोलनामध्ये कॉम्रेड गोविंद आर्द्ड,आसारामजी आर्दड,भरत तौर,बाळराजे आर्दड,जनार्धन भोरे,परमेश्वर मोरे बजरंग तौर, कुलदीप आर्दड, नारायण आर्दड,राधकीसन तौर बालासाहेब राऊत,दिगंबर मोरे,कृष्णा काळे,सुगन्ध काळे,मुबारक पठाण, पंडित गोरे,बापू आर्दड,रवी माने,ज्ञानेश्वर आर्द्ड,रहीम पठाण,राम पागवले, अशोक आर्द्ड,दिलीप हिवाळे,बळीराम आर्द्ड,कृष्णा आर्द्ड,कैलास डेंगळे,योगेश डेंगळे,श्रीमती कल्पना आर्द्ड,सत्यशीला आर्दड,उषा तौर, कोंडाबाई शिंदे,इंदूबाई गोरे,रेखा राऊत,कोमल राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी कामगार मजूर उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक