जालना जिल्हा

जालन्यात अहिर गवली समाज सामुहिक विवाह महासमितीतर्फे गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार

न्यूज जालना दि ९-   अहिर गवली समाज सामुहिक विवाह संस्थापक महासमितीतर्फे गेल्या 25 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतांना आज दि. 9 ऑगस्ट 2020, रविवार रोजी दुपारी 1 वाजता सोनी कॉम्प्लेक्स, जालना येथे शासन व प्रशासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टसींग ठेवून (अंतर राखुन) गुणवत्त विद्यार्थी इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा अहिर गवली समाजा जालनातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अहिर गवली समाज सामुहिक विवाह समितीचे अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थितीत मंगल मंडले चौधरी, लखन चौधरी, जिवनलाल बरेठीये चौधरी, दिनेश भुरेवाल चौधरी, कन्हैय्यालाल भगत चौधरी, देवीलाल भगत, राधाकिशन जांगडे होते. महिला अध्यक्षा ज्योती लालचंद भगत यांनी पदभार स्विकारले, कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजा अर्चनाकरुन वंदना करण्यात आली व समाजाचे द्विवंगत झालेले ज्येष्ठ कार्यकर्त्यांना श्रध्दाजंली देण्यात आली.

या जाहीर सत्कार कार्यक्रमात गुणवंत्त विद्यार्थी ज्यात लाभेश भुरेवाल, आकांक्षा भुरेवाल, रवि सतीवाले, करण सुरटे, वंश यादव, पवन काबलीये, अभिषेक जांगडे, संध्या जांगडे, श्रृती भुरेवाल, सृष्टी सुरटे, कुणाल भगत, देवेश जटावाले, सारांश यादव, स्वाती पनहईवाले, विेवेक नंद, आरती भुरेवाल, रिया भुरेवाल, आदित्य भगत, सोहन खाकीवाले, साजन विजयसेनानी आदी विद्यार्थ्यांनाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जालना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुनिल रुपा पहेलवान खरे यांना भाजपा युवा मोर्चाचे जालना शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. 

यानंतर सर्व समाज बांधवांना नेमीचंद भुरेवाल, पारस नंद यादव, अमर जांगडे, लखन भुरेवाल, संजय रमेश भुरेवाल, संजय गणेश भुरेवाल आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अक्षय भुरेवाल, हरिष भगत, भुषण नंद यादव, लालचंद भगत, मोहन भुरेवाल, नारायण भगत, नारायण गोमतीवाले, अनिल भगत, चेतन भगत, सोनु नंद, शुभम भुरेवाल, यश भुरेवाल, नरेश भुरेवाल, मनिष नंद, रुपालाल भुरेवाल, तुलशीराम विजयसेनानी, देवचंद विजयसेनानी, सुरेश कालीवाले, पंकज खरे, राम भुरेवाल, कमलेश खरे, सोनु खरे, दुर्गेश खरे, मोहन खाकीवाले, सुरेश खाकीवाले, घनश्याम खाकीवाले, मदन जटावाले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समितीचे महासचिव मदन सोनुलालजी भुरेवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमेश काबलीये यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक