Breaking News
भोकरदन तालुका

बांधावर सोडा, दुकानातही यूरिया मिळेना,रेणुकाई पिंपळगाव येथील चित्र

-पिंपळगाव रेणुकाई परिसरातील चित्र : खतांअभावी पिके खराब होण्याच्या मार्गावर, पिंपळगाव रेणुकाई दि ९ शेताच्या बांधावर खते मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता दुकानातून ही खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जमिनीतून डोके वर काढून हवेवर आनंदात झूलणाऱ्या हिरव्यागार पिकांना वेळेत खताचा डोस मिळाला नाही तर काय करायचे या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत युरिया विकत घेण्यासाठी एरिया सोडून आजूबाजूच्या एरियात शेतकरी चकरा मारत आहेत. मात्र पदरात निराशाच पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी खरिपाच्या पेरणीसाठी खते व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानात गर्दी होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र बांधावर खते मिळाली नाहीत आज शेतकरी बाजारपेठेत केविलवाना फिरत असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात यंदा पिंपळगाव रेणुकाई परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या. त्यामुळे पिके जमीनीतून डोके वर काढून आनंदाने डोलत आहे. सध्या पिकांना युरिया शिवाय अन्य खतांची देखील गरज भासत आहे. आणि याच वेळी खताची टंचाई भासत आहे. युरिया बरोबर अन्य खते विकत घेण्याच्या जाचक अटींना शेतकऱ्यांना बळी पडावे लागत आहे. जून महिन्यात जवळपास शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात मिळत होता. मात्र जुलै महिना लागता लागता मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. परिणामी परिसरातील पिंपळगाव रेणुकाई येथील कृषी बाजारपेठ वर उपलब्ध असलेल्या शेलद, करजगाव, कोळी कोठा, जळगाव सपकाळ, रेलगाव, देहेड, वरुड बुद्रुक, मुर्तड, पारध, लेहा, हिसोडा अभी गावांच्या कृषी व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
(शेतकरी ) शेषराव गांवडे युरिया मिळाला नाही तर पिके जाण्याच्या मार्गावर मी गेल्या चार-पाच दिवसांपासून यूरिया मिळण्यासाठी अनेक दुकानांमध्ये चकरा मारल्या. बाहेर गावातील दुकानांमध्ये सुद्धा गेलो असता, मला यूरिया मिळाला नाही. लवकरात लवकर यूरिया व खते मिळाली नाही. तर, पिकांना मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यूरिया उपलब्ध करून द्यावा.

कृषी खात्यातील अधिकारी नॉट रिचेबल-

आमच्या न्यूज जालना”च्या प्रतिनिधींनी युरिया खताबाबत विचारणा केली असता आणि युरिया कधीपर्यंत उपलब्ध होणार याबाबत माहिती विचारली असता, अधिकारी कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नाही. शिवाय, काही अधिकारी हे नॉट रिचेबल असतात अधिकाऱ्यांचे फोन लागत नाही. त्यामुळे ही यूरियाची टंचाई कधीपर्यंत पूर्ण होईल. कधी खते उपलब्ध होतील याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक