जालना जिल्हा

जिल्ह्यात 43 कोरोना बाधीत रूग्णांची भर,एकुण रुग्णांची संख्या 2828

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज जालना दि 09 : जिल्ह्यात आज रविवारी सायंकाळी नवीन 43 कोरोना बाधीत रूग्णांची भर पडली असून त्यात भोकरदन तालुक्यातील 15 तर जाफराबाद तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे.यामध्ये जालना शहरातील केवळ सहा रुग्णांचा समावेश असून यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 2828 इतकी झाली आहे.आज रविवारी सायंकाळी प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर तब्बल 144 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 43 रुग्णांपैकी 15 रुग्ण हे भोकरदन तालुक्यातील असून त्यात फत्तेपुर येथील 6,मासनपूर येथील 5, वडोद तांगडा आणि जलगाव सपकाळ येथील प्रत्येकी 1 तर भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस जवळील 2 रुग्णांचा समावेश आहे. जाफराबाद तालुक्यात 14 रुग्ण आढळून आले असून त्यात खासगाव आणि माहोरा येथील प्रत्येकी 5, वरुड येथील 3,जाफराबाद शहरातील आदर्शनगर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील 4, दैठना खुर्द 2,भारती विद्यापीठ पुणे 1,पोटकर कॉलनी मानवत 1 आणि जालना शहरातील यशवंत नगर, SRP, प्रयाग नगर, मिशन हॉस्पिटल जवळ,संजयनगर आणि शिक्षक कॉलनीतील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधीत असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक