भोकरदन तालुका

भोकरदन येथील सर्व २० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन पोलीस ठाण्यातील वीस पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्‍यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे.
राज्यातील पोलिसांना होत असलेल्या कोरोणाच्या वाढत्या प्रदुर्भवामुळे पोलिस अधिक्षक एस.चैतन्य यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे सांगितले अस्ता त्याअनुषंगाने भोकरदन पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी केली असता ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी दीपक सोन्नी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप शिंदे,नारायण चोबे,सुरेश सोनवणे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वब घेऊन तपासणी केली असता सर्व वीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे.भोकरदन येथील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता यामध्ये सर्व पोलिस कर्मचार्‍यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे.पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन दरम्यान तसेच गेल्या चार पाच महिन्यापासून आपल्या जिवाची काळजी न करता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महेनात घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम केले आहे.


नागरिकांनी सुद्धा कोरोना या संसर्ग आजाराची स्वतः आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारीने काळजी घेण्याचे आव्हान सहय्यक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक