जालना जिल्हा

जिल्ह्यात रविवारी ६० पॉझिटिव्ह,१० डिस्चार्ज,आणि ७ जणांचा कोरोनाने घेतला बळी

न्यूज जालना ब्युरो दि ९

जालना जिल्ह्यात रविवारी परत ६० जणांचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे तर जिल्ह्याची एकूण संख्या ही आता २८०३ वर पोहचली आहे दरम्यान यातील १७४६ जणांना यशस्वी उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे .ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही ९६१ वर पोहचली आहे तर एकूण बळीची संख्या ९६ वर गेली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले.

यात जालना शहरातील बडीसडक ०२ , कन्हैयानगर ०२ , समर्थ नगर ०१ , बालाजी गल्ली ०१ , नुतन वसाहत ०१ , आझाद मैदान ०१ , चंदनझिरा ०२ , नळगल्ली ०३ , खिस्तीपुरा ०३ , मस्तगड ०३ , सदरबाजार ०३ , करवानगर ०१ , मेसखेडा ता मंठा ०१ , मंठा शहर ०१ , देवपिंपळगाव ता जालना ०१ , भोकरदन शहरातील ०२ , म्हसनापुर ०१ , भोगाव ०२ , कोदा ०१ , पिंपळगाव रेणुकाई ०१ , वालसावंगी ०५ , मोहळाई ता भोकरदन ०१ , घारे कॉलनी मंठा ०१ , आनंदवाडी ०१ , सिरसवाडी ०४ , सरस्वती कोलनी परतुर ०१ , आळंद ता देऊळगाव राजा ०१ , रोहणा ता परतुर ०१ , परभणी शहर ०१ , शेलगाव ०१ , देवगाव फाटा ता बदनापूर ०२ , नुतन वसाहत अंबड ०१ एकुण ५३ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ०७ व्यक्तींचा अशा एकुण ६० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली .

ह्या भागातील १० रुग्णास डिस्चार्ज –
जालना शहरातील साई गार्डन ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०१ जवान , रेवगाव ०१ , समर्थ नगर ०१ , सुखशांती नगर ०१ , सिरसाळा सावंगी ०१ , आय टी आय जालना परिसरातील ०१ , शंकर नगर ०२ , राणानगर ०१ एकूण १० रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

ह्या भागातील सात रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी –

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार रविवारी सात करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे . यात भारती विद्यापीठ कात्रज पुणे येथील ७० वर्षीय पुरुष , मजरेवाडी ता जालना येथील ७६ वर्षीय पुरुष , बालाजी नगर परीसरातील ६० वर्षीय महिला , देऊळगाव राजा येथील ७७ वर्षीय पुरुष , भक्ती नगर बुलढाणा येथील ८० वर्षीय पुरुष , कांचन नगर परीसरातील ७६ वर्षीय पुरुष , आनंदवाडी जालना येथील ६५ वर्षीय महिला अशा ०७ रुग्णांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक