Breaking News
परतूर तालुका

दैठणा (खु) येथे डाँ.अण्णाभाउ साठे जयंती साजरी


दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क
तालुक्यातील दैठणा (खु) येथे आज रोजी लोकशाहीर डाँ.अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्य दैठणा गावचे उपसरपंच संपत टकले यांनी डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकला व कोरणा विषयी जनजागृती तसेच यावरील उपाय योजना कशा कराव्यात या बद्दल मार्गदर्शन केले.

या वेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच दैठणा खु. संपत टकले , माजी सरपंच अरविंद सवने , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पांडुरंग सवने , व गावातील नागरीक शासनाच्या सुचनांचे पालन करीत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव घोडे अशोक घोडे, रामा घोडे, रमेश मस्के, दिनेश घोडे, विठ्ठल घोडे, मधुकर मस्के, व आदी दैठणा खु.नागरीकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक