भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यातील वालसावंगीत कोरोनाची एन्ट्री तर पारधला चार जण पॉझिटिव्ह

न्यूज वालसावंगी /ज्ञानेश्वर गवळी दि १० भोकरदन तालुक्यातील सोळा हजार लोकसंख्या असलेली वालसावंगी गावात आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या गावात रविवारी कोरोनाने खाते उघडले.रविवारी गावातील एका व्यक्ती चा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गावात एकच खळबळ उडाली.ग्राम पंचायत कडून तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत वालसावंगी परीसरातील पारध,धावडा,डोमृल,आणि काही खेड्यात ह्या अगोदर रुग्ण आढळुन आले आहे. परंतु वालसावंगीत एकही रुग्ण नव्हता परंतु रविवारी कोरोना एक रुग्ण सापडल्याने संपूर्ण गाव 3 दीवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम पंचायत ने घेतला आहे. आढळून आलेल्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वे करण्यात आला असून पॉझिटिव्ह च्या संपर्कातील हाय रिस्क ची यादी तयार करण्यात आली असून काहींना कॉरनताईन करण्यात आले आहे.तर सदर्भित भाग हा सील करण्यात आला आहे
रुग्णांच्या संपर्कातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्यात आले असून , यातील हाय रिस्क व्यक्तीची यादी तयार करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स व मास्क चा वापर करावा जर कोणालाही सर्दी, ताप, गळा खवखव अशी लक्षणे आढळून येत असतील तर लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी. डॉ .एल कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी वालसावंगी
सरपंच प्रतिनिधी: बाळू आहेर गावातील नागरिकांनी वावरताना मास्क चा वापर करावा नसता ग्रामपंचायत अश्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करेल
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातील अत्यावश्यक सेवे वतिरिक्त सर्व दुकाने पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत ग्रामसेवक- पंढरीनाथ शेरे
पारध का चार जण पॉझिटिव्ह – गाव तीन दिवस बंद भोकरदन तालुक्यातील पारध ( बु ) येथे शनिवारी चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . हा प्रकार पारध वासियांसाठी धोक्याची घंटा आहे . खबरदारी म्हणून गावात पुढील तीन दिवस बंद पाळण्यात येणार असून , सध्या आरोग्य विभागाचे पथक , स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन गावात तळ ठोकून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक