जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

अकोलादेव / बि. डी सवडे दि १० जाफराबाद तालुक्यात नऊ आँगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या रानभाज्या मध्ये कंदभाज्या, फळभाज्या, फुल भाज्या इत्यादी रानभाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला आढळून येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अति महत्त्वाचे व उपयुक्त आहेत. या रान भाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता रानभाज्यांचे प्रदर्शन व महोत्सव तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले होते व शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व, पाककृती इत्यादी माहिती शेतकऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी रान भाजी महोत्सवाचे आयोजन जाफराबाद तालुक्यातील आढा, जाफराबाद, गाडेगव्हाण या ठिकाणी करण्यात आली होती.

या रानभाजी महोत्सवाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी एस टी पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी बोयवर, संतोष गायकवाड, सपकाळ तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागातून व शेतकऱ्यांची उपस्थित पार पाडण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक