Breaking News
जालना जिल्हा

जालन्यात महिलेचा निर्घृण खून,प्रॉपर्टीचा वाद विकोपाला !

न्यूज जालना ब्युरो दि १०

जालना शहरातील काझीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून रविवारी निर्घृण खून केल्याची घटना समोर आले आहे

याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेसह इतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझीपुरा येथील हिना माजीद खान (वय 30) ही विवाहीता पतीसह घरात असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पहिल्या पतीच्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून अचानक हल्ला चढवला. काही विचारण्याच्या आत लोखंडी राॅड व चाकुद्वारे हिना खान वर वार करुन तीला ठार करण्यात आले. तर सोबतच तिचा पती हा ही या हल्ल्यात जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हिनाचा पती सय्यद माजीद सय्यद कय्युम याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह इतर अकरा जणांवर भांदवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सपोनि शिवाजी नागवे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक