Breaking News
परतूर तालुका

डफली बजावो आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल नाटकर

दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क
भारत सरकारने अत्यंत महागडी अशी खाजगी वाहतुक सेवा शुरू करन्याची परवानगी दिलेली आहे. परंतू गोरगरिबांना परवडनारी व महाराष्ट्र शासनाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असलेली एस. टी. बस सेवा कोणत्या कारणाने बंद ठेवन्यात येत आहे. एस. टी. महामंडळ ची बस सेवा शुरू करून दैनंदिन जिवन सुरळीत करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत त्याचाच भाग म्हनुन बुधवार दिनांक १२ आॅगष्ट २०२० रोजी दुपारी १2 वाजता बसस्थानक, परतुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाओ आंदोलन करन्यात येनार आहे.
करिता वंचित बहुजन आघाडी , युवक आघाडी, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाटकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक