भोकरदन तालुका

जालना जिल्ह्यात चार पत्रकारांना कोरोनाची बाधा; एका कुटूंबातील आठ सदस्य संक्रमित

मधुकर सहाने : भोकरदन

जालना जिल्ह्यातील अनेक कोविड योद्धे कोरोना संक्रमित होत आहेत. डाॅक्टर, वैद्यकिय कर्मचारी, पोलीस यानंतर आता जिल्ह्यातील चार पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर एका पत्रकाराच्या कुटूंबातील तब्बल आठ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोना संक्रमित आढळून आलेल्या पत्रकारामध्ये जालना शहरातील दोन,परतूर येथील एक व भोकरदन येथील एकाचा समावेश आहे तर भोकरदन येथील पत्रकाराच्या कुटुंबातील तब्बल आठ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत.

कोरोना संक्रमित या सर्वांना उपचारासाठी कोविड हाॅस्पिटल व कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक