भोकरदन तालुका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासुन भोकरदन शहर पाच दिवस बंद

  मधुकर सहाने : भोकरदन

  भोकरदन शहरात व तालुक्यात कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढ होत असुन,शासकीय अधिकारी,नगर परिषद,व व्यापारी महासंघ यांनी नुकतीच बैठक घेवुन उद्यापासुन पाच दिवस भोकरदन शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात गेल्या आठवड्याभरापासुन दिवसेंदिवस नविन कोरोना पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असुन हि साखळी तोडण्यासाठी दि.११ आॅगस्ट रोजी शासकिय अधिकारी,नगर परिषद ,तसेच शहरातील व्यापारी संघटना यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की,दि.१२ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट मध्यराञीपर्यंत भोकरदन शहरातील सर्व छोटी मोठी दुकाने बंद तसेच जनता कफ्युचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

  तरी सर्व भोकरदन शहरातील व्यापारी वर्गातील बांधवांनी आप आपली दुकाने बंद ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक