जालना जिल्हा

मंगळवारी दुपारी जालन्यात 24 रूग्णांची वाढ: एकूण संख्या 3010 वर

न्यूज जालना ब्युरो दि११

जालना जिल्ह्यात आज मंगळवारी दुपारी आणखी 24 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात जालना शहरातील 5 तर उर्वरीत 19 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.या 24 रूग्णांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या आता 3010 इतकी झाली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.
मंगळवारी सकाळी 28 रूग्णांची वाढ झाली होती. त्यात आणखी 24 रूग्णांची वाढ झाली असून त्यामध्ये जालना शहरातील निर्मळ नगर रेल्वे स्टेशन रोड, टाऊन हॉल,भवानी नगर, गुडलागल्लीआणि समर्थनगर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच कंडारी अंबड येथील 4, घनसावंगी,तिर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि मुरमा येथील प्रत्येकी 3 तर भोगगाव येथील 2 आणि देवी दहेगाव ता.घनसावंगी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. काल सोमवार पर्यंत 1810 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून 100 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे या सुत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक