घनसावंगी तालुका

पिपंरखेड बु सह परिसरात ऊसावर मिलीयाबग रोगाचा अटॅक


याेग्य मार्गदर्शन करण्याची शेतकरीवर्गाची मागणी

धर्मराज आंधळे /पिपंरखेड बु दि ११
घनसांगी तालुक्यातील अनेक भागात उसाची माेठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे
पैठन डाव्या कालव्याला पाणी असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा अधिकची लागवड झाली आहे
आणी आता उसावर मिलियाबग या रोगाने चांगलाच अटॅक केला आहे

परिसरातील पिंपरखेड,अरगडे गव्हान,कंडारी सह परिसरातील ऊसावर मिलियाबग या पांढरी माशीचा ने रोगाचा मोठा अट्याक केला असून ऊसावर प्रादुर्भाव वाढत चालला असून शेतकरी आता चिंतेत दिसून येत आहे.


ऊसाची पाने पूर्ण पोखरून या रोगाने रसाचे शोषण करून ऊस पूर्णपणे पिवळा पडला आहे त्याची वाढ खुंटली असून यावर्षी उसाचे लागवडीचे क्षेत्र जास्त आहे शेतकरी नेहमीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असून आधीच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय यामध्ये सर्वसामान्य जनता हैराण झाली असल्याने सर्वजण शेतकरी भयभीत झाले आहेत लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला यावर्षी भाव मिळाला नाही कवडीमोल भावात विकावा लागला शेतकऱ्यांचा मोठे नुकसान होत आहे

त्यात आता हाताला आलेले भरवाशाची ऊसाचे पीक त्यावरही मिलिया बग रोगाने मोठा अटॅक केल्याने अता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांनी यावर्षी ऊसावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे या रोगापासून बचावासाठी कृषी विभागाकडून योग्य उपाययोजना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतक-यांमधून होत आहे.शेतकरी आता हतबल झाला आहे.

अश्या प्रकारे रोग पडला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक