Breaking News
बिड जिल्हा

जिल्ह्यात 9 तालुक्यातील 20 गावांसह 4 शहरातील एकूण 11 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज बीड, दि, 11 : जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 20 गावांसह 4 शहरातील एकूण 11 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

बीड तालुक्यातील या गावांमध्ये आहेर धानोरा, बहिरवाडी, चिंचोलीमाळी, आनंदवाडी, तळेगाव, जिरेवाडी, गेवराई तालुक्यातील अर्धमसला कथोडा, पाटोदा तालुका येथील खडक डोह ,डोंगरकिन्ही, गितेवाडी शिरूर कासार तालुक्‍यातील गोमळवाडा व रायमोह माजलगाव तालुक्यातील नित्रुड, केज तालुक्यातील डोनगाव, बनकरंजा , आष्टी तालुक्यातील भातोडी व सिराळ, परळी तालुक्यातील जीरेवाडी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सेलू अंबा या गावात तसेच

अंबाजोगाई शहरातील सुभद्र नगर जिरेगल्ली गांधीनगर भाग – 2, परळी शहरातील वडसावित्री, पंचशील नगर, एक मिनार चौक व शिवाजीनगर, केज शहरातील देशपांडे गल्ली, समतानगर व फुलेनगर वडवणी शहरातील विष्णुपंत पंधारे व गणेश जोशी यांच्या घरा मधील रस्ता, गुरु प्रसाद गुरु साडी यांच्या घराच्या पश्चिमेकडील बोळ, अनिल ढवळ शंख घर व ओम प्रकाश काजवे यांच्या घरांमधील रस्ता या सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे .

या 20 गावात व शहरांमधील वरील संबंधित 11 परिसरात कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.

राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक