बुलढाणा जिल्हा

माजी सैनिकांच्या इयत्ता 10 वी 12 सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पाल्यांचा होणार सन्मान

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज बुलडाणा, दि. 11: जिल्ह्यातील युद्ध विधवा व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या पाल्याचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना एअर मार्शल व्ही. ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार मिळणार आहे. इयत्ता 10 व 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उर्तीण झालेल्या एक -एक पाल्याचे नाव एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आवश्यक कागदपत्रांसह दि. 16 सप्टेबर 2020 पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे कल्याण संघटक, सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे. संपर्कासाठी कार्यालयीन दुरध्वनी क्र. 07262-242208 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक