Breaking News
बदनापूर तालुका

किन्होळा येथुन बैल जोडी चोरी, गुन्हा दाखल

भोकरदन/बदनापूर प्रतिनिधी

बदनापूर तालुक्यातील कीन्होळा येथे दि.२ आॅगस्ट रोजी सकाळी 6 च्या सुमारास येथील शेतकरी विजय दत्तूपंतो जोशी हे शेतकरी शेतात गेले असता त्यांना बैल खुट्यावर दिसले नाही. दरम्यान त्यांनी सर्व बाजूला चौकशी केली असता बैलांचा पत्ता अद्यापही लागला नाही.

बैल जोडी आसपास चौकशी करुनही सापडली नाही म्हणून त्यांनी बदनापूर पोलिस ठाणे येथे तक्रार केली असता बैलांचा शोध घेऊ असे पोलिस कर्मचारी यांनी सांगितले.

अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. बैला चा पांढरा आणि पांढरा बांडा असे कलर बैलाचे आहे. दरम्यान बैल जोडी कोणाला आढळल्यास त्यांनी पोलिस ठाणे बदनापूर येथे माहिती द्यावी असे पोलिस निरीक्षक मारोती खेडकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक