Breaking News
जाफराबाद तालुका

अकोलादेव गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने साथरोगाचा वाढला धोका !

ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ वैतागले

अकोलादेव / बि. डी. सवडे जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे स्वच्छता अभियानाचे तिन तेरा वाजले असुन गावात मोठ्याप्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने ऐन पावसाळ्यात साथरोग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरस या महामारीने थैमान घातले असुन या रोगाने आता ग्रामीण भागात शिरकाव केल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण असतांना ग्रामपंचायत सुरक्षा म्हणून गावात कोणत्याही प्रकारची सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आलेली नाही

गावात सध्याच्या परिस्थितीत गटारी तुंबलेल्या आहे.त्यामुळे मच्छर डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावातील लहान मुले. वयोवृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्राम पंचायत चे दुर्लक्ष आहे

पर्यावरण संतूलन योजने अंतर्गत दर वर्षी किती झाडे लावली व कुठे लावली व आतापर्यंत किती झाडे जिंवत आहे. याबाबत या सर्व कामांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष किसन सरकार, यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक