Breaking News
जालना जिल्हा

निवृत्ती महाराज लकडे यांची अखिल वारकरी संघ जालना जिल्हा अध्यक्ष पदी निवड

बबनराव वाघ, उपसंपादक

बबनराव वाघ, उपसंपादक : जालना तालुक्यातील रामनगर येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प निवृती महाराज लकडे यांची  अखिल वारकरी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह भ प मछिंद्र महाराज धानेपकर यांच्या अनुमतीने जालना जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल युवा सेना तालुकाध्यक्ष शिवाजी संताराम शेजुळ, बाबा आमटे, गणेश जुये, कैलास डवले, नारायण शेजुळ, गणेश थेटे, महादेव काटकर, ह भ प सुखदेव महाराज गोरे आदींनी अभिनंदन केले.

अखिलवारकरी संघाचा मि अत्यंत आभारी आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून खुप मोठी जबाबदारी टाकली आहे ति मी अत्यंत निष्ठेने पार पाडीन. वारकरी सांप्रदायाचे बीज प्रत्येकाच्या -हदयात बिंबवण्याचे काम मी पुर्णपने पार पाडीन – ह भ प निवृती महाराज लकडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक