घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात २७ वर्षीय गरोदर महिला पॉझिटिव्ह

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील कोणाचाही संपर्कात न आलेल्या एका २७ वर्षीय गरोदर महिलेची बुधवारी अँटीजण चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बुधवारी कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १२ जणांची अँटीजण चाचणी करण्यात आली यात ११ जणांचा अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाला तर एका महिलेचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे . सदर्भीत महिलेच्या संपर्कात तूर्तास कोणीही संपर्कात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे याबाबतआरोग्य विभागाकडून हाय रिस्क यादी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . नागेश सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ . दीपाली चव्हाण – राठोड , आरोग्यसेवक एकनाथ पोपळघट, आरोग्य सहायिका ऊर्मिला वळसे , अलका वाडे , छाया मेश्राम , डिगांबर कवठेकर हे तपासणी करीत आहेत . (फोटो प्रतिकात्मक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक