Breaking News
भोकरदन तालुका

स्वतंत्रदिनापासून जिल्ह्यात व्यसनमुक्त महाराष्ट्र उपक्रम

राजूर प्रतिनिधी दत्ता डवले दि १२
सध्याच्या परिस्थितीत व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा व वाढते प्रमाण हि चिंतेचे बाब आहे.यामुळे नशा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यापासून होणारे दुष्परिणाम व धोके याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जन जागृती व्हावी या करिता नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ,मुंबई व सहारा सामाजिक विकास संस्था ,चांदई ठोंबरी ता,भोकरदन यांच्या सयुंक्त विद्दमाने स्वतंत्र दिनापासून जालना जिल्ह्यात नशामुक्ती साठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जन जागृती करण्यात येणार आहे.अशी माहिती सहारा चे अध्यक्ष बी.एस.सय्यद यांनी दिली आहे.


जिल्ह्यातील वाढते व्यसनांचे प्रमाण व त्यापासून उध्वस्त होणारे कुंटूब व व्यसनी व्यक्तीचे होणारी दुर्दशा हे थांबविण्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती चे कार्य करणाऱ्या संस्था ,संघटना च्या सहकार्याने व्यसन मुक्त महाराष्ट्र,सक्षम महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येणार आहे.इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून अनेक थोर महापुरुषांने आपले बलिदान देऊन देशाला मुक्त केले .

व आपल्याला स्वतंत्र मिळून दिले.या दिनाचे औचित्य साधून समाजाला व्यसनांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जन जागृती करण्याची गरज आहे साठी या दिनापासून नशामुक्ती चा जागर करण्यात येणार आहे.यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग घ्यावा .


कोवीड -19 आजाराच्या प्रतिबंध साठी लॉकडाऊन करण्यात आला होता .या काळात व्यसनाचे प्रमाण खुप कमी झाले होते.व अनेक व्यक्ती व्यसनमुक्त हि झाल्या हा सकारात्मक बदल पहायला मिळाला . परंतु अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली व व्यसनांचे प्रमाण वाढत आहे.याचा विपरीत परिणाम महिला ,मुले ,विद्यार्थी यांच्या मानसिकतेवर होत आहे.या व्यसनांच्या विळख्यात युवक मोठ्या संख्येने दिसून येत आहे. यासाठी सदर सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील वाढती व्यसनधिनता संपविण्यासाठी जन जागृती चे काम हाती घेतले आहे.


कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार सोशल डिस्टींग पाळून कार्यक्रम घेण्यात येणार आहे.यामध्ये अॉनलाईन वेबीनार,कार्यशाळा ,चर्चासञ,व्याख्यान ,चिञकला,निबंध,पोस्टर,गीत गायन आदी स्पर्धा चे आयोजन करण्यात येणार असून त्या द्वारे समाजात नशामुक्ती चा जागर करण्यात येईल अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास ,सचिव अमोल मडामे व सहाराचे बी,एस.सय्यद यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक