जालना जिल्हा

परतूर तालुक्यात एकूण कोरोना बधितांचा आकडा ११२ वर

परतूर शहरासह तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि १३

परतूर तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या -112 वर पोहचली असून या पैकी सुट्टी झालेले रुग्ण – 50,दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू – 04 व उपचार घेत असलेले असलेले 58 रुग्ण आहेत.


बुधवारी दिवसभरात ग्रामीण रुग्णालय परतूर येथे अटीजन टेस्ट मध्ये जय भवानी कॉलनी परतूर येथील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला
असे दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले होते .

तर प्राथमिक आरोग्य केंद्र सातोना येथेही रॅपिड टेस्ट केली असता 49 वर्षे पुरुष ( मूळ रहिवाशी सेलू) असे एकूण तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असताना रात्री उशिरा आलेल्या अहवाला नुसार रामेश्वर गल्ली परतूर येथील 56 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 19 वर्षीय पुरुष, व दत्तनगर येथील
68 वर्षीय पुरुष असे एकूण 9 जणांचे अहवाल दि. बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.

बुधवारी दिवसभरात आष्टी येथील आठ कोरोना रुग्ण बरे होऊन त्याना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद वाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक