जाफराबाद तालुका

अकोलादेव येथे अज्ञात तापाची साथ,स्थानिक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

अकोलादेव /बि.डी सवडे दि १३
अकोलादेव न्यूज जालना लाईव्ह स्टार प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यात सध्या पाऊसाचे वातावरण असल्याने सर्वत्र ओलावा तयार झाला आहे यामुळे अनेक लहानांसह मोठ्यांनाही अज्ञात तापाची लागण झाली असून स्थानिक आरोग्य विभाग कोरोना प्रादुर्भावाच्या नावाखाली याबाबीकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांतुन होत आहे स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी गावामधील नागरिकांचा एखाद्या ग्रामस्थांमुळे आपल्याला कोरोना संसर्ग होईल या भीतिपोटी औषधी किंवा तपासणी करण्यास ते टाळाटाळ करत आहेत. उपकेंद्र कर्मचारी रुग्णालयाला कुलूप लावून आत मधून खिडकीतूनच उपचार करीत आहेत. गावात बालके अज्ञात तापाने आजारी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे ,सध्या गावात जवळपास 20 ते 25 बालकांना डेंगूसदृश ताप, पांढऱ्या पेशी कमी होणे इत्यादी आजार बालकांना जडलेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत संबंधितांनी वेळीच लक्ष द्यावे नसता निष्काळजी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी उपसरपंच रामेश्वर सवडे, ग्रामपंचायत सदस्य किसनराव सवडे, ग्रामपंचायत सदस्य रामराव मोढेकर, शंकर सवडे यांच्यासह त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक