परतूर तालुका

परतुरात बससेवा सुरळीत करण्यासाठी वंचीत चे आंदोलन


दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क दि १३
सर्वसाधारण सामान्य व्यक्तीना परवडणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली ही सेवा महाराष्ट्र शासनाकडे सेवा देण्यासाठी पुरेशी आहे

बससेवा सुरू जर केली तर सर्वसामान्यला मोठा दिलासा मिळू शकतो व त्यांचे व्यवहार सुरळीत होतील व त्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही या मागणीसाठी वंचित बहुजनची संपूर्ण महाराष्ट्रभर डफली बजाओ आंदोलन करण्याची हाक दिली होती त्यांच्या या आदेशाचे पालन करीत बुधवारी परतूर बस आगारप्रमुख यांच्या कार्यालयासमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाटकर, तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे,शहर अध्यक्ष प्रभाकर प्रधान, ज्येष्ठ नेते चोखाजी नाना सौंदर्य, मानव मुक्ती मिशनचे मराठवाडा विभाग अध्यक्ष सय्यद रफिक, मंठा तालुका अध्यक्ष डॉक्टर त्रिभुवन,युवा जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव, प्रकाश मस्के दिपक हिवाळे, पांडुरंग शेजूळ, रवी भदर्गे, प्रशांत वाकळे तथागत प्रधान, अच्युत कामिठे, बुद्धीस्ट प्रेरणा ग्रुप मंठाचे तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव मिलिंद खंदारे आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,लाल परी चालू झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक