जालना जिल्हा

जिल्हाधिकारी जालना यांच्या वाहनाला किरकोळ अपघात.

न्यूज जालना ब्युरो दि १३ जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या गाडीला गुरुवारी जालन्यात अपघात झाला असल्याचे समोर आले आहे सदर्भित अपघातात कुठलीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी (१३ ऑगस्ट ) दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे कार्यालयातून बाहेर पडत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोरच गाडीची चाके पावसाच्या पाण्यामुळे स्लिप होऊन गाडी डिव्हायडरला धडकली. हा किरकोळ प्रकारचा अपघात असून जिल्हाधिकारी बिनवडे यांना कसल्याही प्रकारची शारीरिक इजा झालेली नाही. ते सुखरूप आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी न्यूज जालना ला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक