परतूर तालुका

धनगर समाजाचे रक्ताने लिहलेले तहसिलदारांना निवेदन


दिपक हिवाळे / परतुर न्यूज नेटवर्क दि १३
धनगर एक्य अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने परतुर तहसीलदारांना रक्ताने लिहिलेले मागण्याचे निवेदन दिले आहे.


रक्ताने लिहीलेल्या निवेदनात धनगर समाजाला एसटी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा , एक हजार कोटी रुपयांची तरतूद त्वरित करा, व मेंढपाळाला वरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या या आशा मागण्या धनगर अभियान महाराष्ट्र राज्यच्या वतीने धनगर समाजाने रक्ताने लिहीलेले निवेदन परतुर तहसीलदारांना दि.13/08 / 2020 रोजी दिलेले आहे . सरकारने गांभीर्याने विचार करून धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात नाही तर महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा रक्त लिखित निवेदनात दिलेला आहे.

दिलेल्या निवेदनावर विष्णू गुंजाळ ,कपिल दहेकर, भगवान पाटोळे, नंदकुमार माने, प्रकाश मुळे ,नामदेव गोरे, शिवाजी तरवटे, दत्ता कोल्हे ,नाना डोणे ,बळीराम नारायण काळदाते ,गोपाळ काकडे, भगवान भाऊराव पितळे , विष्णू बाबासाहेब भालेकर ,बाळू आसाराम शेळके, प्रमोद सुभाषराव पिसाळ, अक्षय सुरेश आढाव, अभिजीत रंगनाथ रोकडे, आकाश प्रकाश भालेकर, दिपक उनवणे ,योगेश घोंगडे, लिंबाजी रोकडे, गजानन मुळे, दादाराव बक्काल , मारुती पारडगावकर ,अशोक गायकवाड ,रमेश गुरव ,ज्ञानेश्वर गुरव ,शामराव गुरव, सुभाष गुरव, एकनाथ गुरव, दत्ता धुमाळ, अर्जुन गुरव, मारुती परतूरकर, योगेश नारायण गायकवाड, परमेश्वर सिताराम गुरव ,रामदास सिताराम गुरव, रामेश्वर बापूराव काकडे व आदी धनगर समाजातील नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक