अंबड तालुका

अंबड तालुक्यातील जामखेेेड परिसरात अवैध वृक्षतोड जोमात

जामखेड / , विशाल भोजने

अंबड तालुक्यासह जामखेड व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे व हि अवैध लाकूड वाहतुक जामखेड मार्गे होत आहे. ही वाहतूक रात्री होत असून यामध्ये लिंब,सागवन,लाकडे तस्करी केली जात आहे याकडे वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.

एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड करत आहे तर अवैध वृक्षतोड व वाहतूकीच्या या कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर होत आहे. या वृक्षतोडीमुळे वृक्षप्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे. याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष देऊन वृक्षतोड व जामखेड परिसरातुन होत असलेली अवैध लाकूड वाहतुक थांबवावी अशी मागणी वृक्षप्रेमी तुन होत आहे.

हि अवैध लाकुड वाहतुक करणारे वाहने जामखेड येथुन राज्यमहामार्गाने सुसाट वेगाने रात्री बेरार्ती वाहत असुन गावातील नागरिकांना जीवीत हानीचा धोका निर्माण होत आहे.(फोटो प्रतिकात्मक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक