भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात सर्जाराजाच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

बळीराजाच्या उत्साह मावळला;ग्राहकच नसल्याने चिंता वाढली-दुकानात शुकशुकाट

पिंपळगाव रेणुकाई दि १३

शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा बैलांचा पोळा सण अवघ्या पाच दिवसांवर आला आहे . सणाला लागणाऱ्या साहित्याची दुकान पिंपळगावात सजली असली तरी मात्र कोरोनामुळे दुकाने ओस पडल्याचे चित्रं सध्या तरी दिसत आहे फार मोजक्याच प्रमाणात ग्राहक दुकानात येत असल्याने आम्ही पोळा सणाला खरेदी केलेल्या साहित्याला पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकच नसल्यामुळे विक्री होत नाही असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले .

तसेच हा शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा बैल पोळा सण १८ ऑगस्ट रोजी आहे .आता हा सण पाच दिवसावर आला आहे. पोळ्याला लागणाऱ्या साहित्याची खरेदी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात करुन
दुकाने सजवली मात्र कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे ग्राहक नसल्याने दुकानदाराची चिंता वाढली आहेत .

दुकाने ओस पडल्याचे चित्र सध्या परिसरात पाहावयास मिळत आहे. बैलाला लागणारे साहित्याचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत . यात मोरकी ८० रुपये , कासरा १८० , वेसण ४० , , कवडी माळ २०० ते २५० , मणी माळ १२० ते १५० , झूल १२०० ते १५०० , बाशिंग १४० , चुंगरु पट्टा ६०० रुपये असे भाव आहेत .

कोरोनामुळे सर्व ठिकाणचे कारखानेच काही दिवस बंद होते . त्यामुळे साहित्य पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होवु शकले नाही परिणामी साहित्य कमी मिळाले . परंतु टंचाईमुळे भाव देखील वाढले आहे.असे परिसरातील व्यापाऱ्याकडून ऐकावयास मिळत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक