जाफराबाद तालुका

जे. बी. के. विद्यालयात राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी

कुंभारझरी/ ज्ञानेश चव्हाण दि १३

तालुक्यातील टेम्भुर्णी येथील श्रीमती जे. बी. के. व नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात, राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी, करण्यात आली.
राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्य खूप महान होते व त्यांनी स्वतः तलवार हातात घेऊन स्वराज्याची विस्कटलेले घडी पुन्हा बांधून अनेक परकीय शत्रूंना झुलवत ठेवलं.त्यांनी केलेले कार्य आजही इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे.असे मत प्रा दत्त देशमुख यांनी व्यक्त केले या छोट्या खाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक लक्ष्मीकांत बूकंदाने, होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्रा. दत्ता देशमुख,चेके सर, काळे सर, बोरकर सर, सोलन्के सर, रिंढे सर, दत्ता उखर्डे सर, डोमळे सर, सकुंडे सर, अझर मामा, तांबेकर मामा, यांची उपस्तीथी होती, सर्वांनी, प्रतिमेस पुष्प हार अर्पण केले, त्याच बरोबर काळे सर, यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक