Breaking News
परतूर तालुका

आष्टीत ऐन पावसाळ्यात भूमिगत गटाराचे काम कासवगतीने

भूमिगत गटाराच्या कामाने गावातील रस्त्याने चालणे झाले कठीण

आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता परतूर येथे गेल्या महिन्या पासून महावीर चौक ते जुना ठाणा परिसरात भूमिगत गटाराचे काम सुरू असल्याने रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांना गावात जाणे येणे मुश्किल झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे


या विषयी अधिक महिती अशी की गेल्या महिन्या पासून आष्टीत भूमिगत गटाराचे काम सुरू असून सध्या हे काम महावीर चौक ते जुना ठाणा परिसर या मुख्य रस्त्यावर होत असून गावात कोठे ही जायचे म्हणटले की या मुख्य रस्त्यावर आल्या शिवाय पर्याय नाही त्यातच कोरोना चे रुग्ण ज्या भागात आहेत तो भाग रहदारीसाठी बंद करण्यात येत असून या मुख्य रस्त्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांची मोठी कोंडी होत असून होत असलेले काम कासव गतीने होत असून त्यातच येन पावसाळ्यात हे काम सुरू असल्याने व रस्ते खोदल्याने नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले असून मोटार सायकल चिखलात फस्त असून पाऊस पडल्यावर खोदलेल्या रस्त्यात पाणी जमा होऊन मोठे खड्डे पडत असल्याने त्यात नागरिक पडत असल्याच्या घटना पहावयास मिळत असून या कामास गती देण्यात यावी व खड्डे व्यवस्थित बुजविण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक