जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यातील बुटखेड्यात 1000 वृक्ष लागवड


टेंभुर्णी/सुनील जोशी
बुटखेडा ता जाफ्राबाद येथील ग्रामपंचायत च्या वतीने गाव आणि परिसरात 1000 वृक्ष लागवड करत उद्दिष्ट पूर्ण केले आहे.ग्रामपंचायत च्या वतीने हिंदू स्मशान भूमी,गावातील जिल्हा परिषद शाळा, स्वामी विवेकानंद विद्यालय, वस्ती शाळा, तांडा वस्ती, ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड करण्यात येऊन आपल्या शेतात,अंगणात लागवड करण्यासाठी ग्रामस्थांना देखील रोप वाटप करण्यात आले.वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच रुखमन पवार, उपसरपंच सुधाकर निकाळजे, प्रकाश पांडव, संदिप पवार, वैशाली बनकर, किरण बनकर, योगेश बनकर, वच्छलाबाई बदर, द्वारकाबाई पवार, जिजाबाई पवार, ग्रामसेविका सुलताने, किशोर जाधव, दत्तात्रय नागवे, दादाराव बनकर, शालिक पवार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक