Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात अँटीजन चाचणीतील 42 जनांसह दिवसभरात 136 रुग्ण पॉझिटिव्ह


न्यूज जालना ब्युरो दि १३
जालना जिल्ह्यात आज गुरुवारी अँटीजन चाचणीत आढळून आलेल्या 42 कोरोना बाधीत रुग्णांसह दिवसभरात एकूण 136 नवीन रूग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील जनतेतुन चिंता व्यक्त केली जात आहे.

जालना जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारनंतर पहिल्या टप्प्यात 50,त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 आणि 14 तर तिसऱ्या टप्प्यात 28 अशा एकूण 94 संशयीत रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.अँटीजन चाचणीत एकूण 1208 पैकी 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज दिवसभरात एकूण 136 रूग्णांची भर पडली आहे. आज रात्री नव्याने पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 28 जणांमध्ये जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील सर्वाधिक 8,लोधी मोहल्ला येथील 6,संजयनगर आणि समर्थनगर येथील प्रत्येकी 3,रामनगर येथील 2 आणि लक्ष्मीनगर अंबड रोड जालना, जुना मोंढा परतूर,दरेंगाव,कचरेवाडीता.जालना,अकोला तांडा आणि टेम्भुर्णी ता.जाफराबाद येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक