घनसावंगी तालुका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिपंरखेड बु आठ दिवस कडकडीत बंद

धर्मराज आंधळे/पिंपरखेड दि १४
घनसांवगी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून पिपंरखेड ग्रामपंचायतच्या वतिने सात दिवस आपापली दुकाने बंद व जनता कर्फ्यू ठेवण्याचे आवाहन १४ ऑगष्ट रोजी केले आहे. त्यानुसार, १५ ऑगष्ट ते २२ ऑगष्ट असा आठ दिवस जनता कर्फ्यू ठेवण्यात येणार आहे. अद्यापपर्यत एकही कोरोनाबाधीतला गावात एन्ट्री करू न देण्यास पिंपरखेड ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे

ह्या बंद मध्ये फक्त जीवनावश्यक वस्तुच्या दुकाणा ह्या सकाळी ७ ते सांयकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. गावात येणाऱ्या तिनही मुख्य मार्गावर चेक पाेस्ट करण्याचा निर्णय ग्रामपंचायत ने घेतला आहे .तरीही पिपंरखेड बु गावातील काेनत्याही व्यक्तीने बाहेर गावातील व्यक्ती गावात येण्यासाठीची शिफारस किंवा विनंती करु नये .
पिपंरखेड बु कु.पिपंळगाव,सिंदखेड तिर्थपुरी, मुरमा,खडका,काेठी, या गावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गावात गर्दी होत असल्याने समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक