घनसावंगी तालुका

राजूरकर कोठा गावात दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १४ घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत राजूरकर कोठा गावात शुक्रवारी दुपारी दोन जणांचे अँटीजन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे कोरोनाचे रुग्णांची वाढ कुंभार पिंपळगाव येथे वाढत असताना आता ग्रामीण भागातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे राजूरकर कोठा येथील ४५ वर्षीय महिला व २५ वर्षीय महिलेचा समावेश असून आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. राजा टाकळी प्राथमीक आरोग्य केंद्राअंतर्गत शुक्रवारी दुपारी १७ जणांच्या अटीजन चाचणी करण्यात आल्या त्यात दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आले तर पंधरा जणांचे अहवाल निघेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी उमरे यांनी न्यूज जालनाला बोलताना सांगितले संदर्भित रुग्णांच्या संपर्कात कोन कोण आले व हाय रिस्क यादी तयार करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक