घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात काही गावात बालविवाहची प्रथा – पोलीस अनभिज्ञ


जांब समर्थ प्रतिनिधी /कुलदीप पवार दि १४

घनसावंगी तालुक्यातील लॉकडाऊन च्या काळात बालविवाह ची जणू प्रथाच पडली की काय असा प्रश्न उपस्थित होत असून याकडे पोलीस सह बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष आहे


बालविवाह हा सामुहिक बलात्कारापेक्षाही मोठा गुन्हा असुन,या विषयी सामाजिक जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु घनसावंगी तालुक्यातील अनेक गावासह विरेगव्हाण तांडा येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे १८ वयोवर्ष पुर्ण असलेल्या मुलींचे लग्न करता येते, मात्र अवघ्या १३,१४,१६,१७, इतक्या कमी वयातच मुलींचे लग्न होतांना दिसत आहे.

या बाबत गावात बालविवाह संदर्भात मुलींच्या आई वडिलांना समुपदेशन करुन जनजागृती करणे गरजेचे असुन, परंतु येथील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व ग्रामपंचायत यांचे बालविवाह रोखण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, व येथील प्रशासनाच्या वरदहस्तामुळे हे बालविवाह पार पडत तर नाही ना असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बालविवाह रोखण्याची मागणी जोर धरीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक