भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात लष्करीला रोखण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

पिंपळगाव रेणुकाई/प्रतिनिधी
पिंपळगाव रेणुकाई परिसरात डोक्यालगत वाढलेल्या मका पिकावर लष्करीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणी कशी करावी? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलेला आहे. तरीही पीक वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत असून मकाच्या एक-एका पोंग्यात किटकनाशक सोडण्याचे कष्टाचे काम करत आहेत.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात लष्करीच्या भीतीने मका पिकाचे प्रमाण घटले आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. त्यापैकी बऱ्याच जणांना आता पश्चाताप होत आहे. यावर्षी देखील मका पिकाला लष्करी अळीने घेरले असून, महागडी रासायनिक कीटनाशक औषधे फवारली असून देखील अळीचा नायनाट होताना दिसत नाहीये. त्यातच मक्याचे पीक मोठे झाल्याने फवारणी करूनही पोंग्यात लपलेल्या अळीपर्यंत कीटनाशक औषधे पोहचत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, काय करावे हे त्यांना सुचेनासे झाले आहे. तरीही मोठा खर्च करून लागवड केलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही शेतकरी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कीटनाशके भरून ती हाताने मक्याच्या पोंग्यात टाकत आहे. हे काम अत्यंत कष्टदायक असले तरी पिक वाचविण्यासाठी शेतकरी हे उपाय करीत आहे. यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.


कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता….
लष्करी अळीला कसे रोखावे या संभ्रमात शेतकरी असताना, त्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक