भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांच्या चिघळलेल्या जखमेवर आता पावसाचे पाणी

पिंपळगाव रेणुकाई दि १४

पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी पावसाने सुरुवात चांगली केली, असल्यामुळे खरिपाचा हंगामाने धरला होता. शेतातल्या हिरव्यागार डोलणाऱ्या पिकापासून कोरोनाची जखम खपली धरत असतानाच आता, गेल्या पाच-सहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे ही जखम चिघळू लागली आहे. शेतातील पीकही पाण्यात पोहत असल्याचे चित्र शेतकऱ्याची धाकधुक वाढण्याचे कारण ठरत आहे. जर, आता पाऊस उघडला नाही. तर, शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. सूर्यप्रकाश नाही आणि हा अतिपाऊस पिकाला अजीर्ण ठरत आहे. तर काही शेतामध्ये पाणी साचल्याने पिके सडून जाण्याच्या मार्गावर आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मात्र, हा पाऊस उघडला नाही. तर मात्र, या पिकांवर विपरीत परिणाम होणार आहे. मागील गेल्या पाच-सहा दिवसांपासून कधी सौम्य, कधी हलक्या तर, कधी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. या पावसाने जणू मुक्कामच ठोकला आहे. यंदा दृष्ट लागण्यासारखे कपाशीचे पीक असताना या अनियमित पावसाने शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर राहिला तर पिकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पिंपळगाव रेणुकाई/प्रतिनिधी

गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यातच ढगाळ वातावरण आणि ऊन सुद्धा नाही. याचा परिणाम पिकांवर झाला आहे. मी पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे कपाशी पिवळी पडत आहे. जर लवकरात लवकर पाऊस उघडला नाही. तर, कपाशी पूर्ण खराब होणार आहे.

गजानन देशमुख (शेतकरी,पिंपळगाव रेणुकाई)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक